रांगणा-तुळसूली जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना ३० सायकलींचे वाटप

0
18
रांगणा-तुळसूली जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना ३० सायकलींचे वाटप
रांगणा-तुळसूली जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना ३० सायकलींचे वाटप

रांगणा-तुळसूली जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना ३० सायकलींचे वाटप

रांगणा-तुळसूली :
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास सुलभ व्हावा आणि त्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी सुविधा मिळावी, या उद्देशाने रांगणा-तुळसूली येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना ३० सायकलींचे वाटप करण्यात आले. शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक श्री. किशोर पाटकर यांच्या वतीने या सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या.

या सायकलींचे वाटप माजी सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) तसेच राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित श्री. मधुकर गणपत सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमासाठी नवी मुंबई शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. अजित सावंत आणि उपशहर प्रमुख श्री. महेश परब ,जि.प. सदस्य श्री नागेश आईर यांनी विशेष सहकार्य केले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, शाळेपर्यंतची त्यांची दैनंदिन ये-जा सुलभ व्हावी आणि आर्थिक किंवा वाहतुकीच्या अडचणींमुळे त्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये, या सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाला रांगणा-तुळसूलीच्या सरपंच, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायकली मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक करून श्री. किशोर पाटकर, श्री. अजित सावंत आणि श्री. महेश परब यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here