राज्यपालांच्या लोकभवनातील श्री गणरायाचे कृत्रिम हौदात विसर्जन

0
13
राज्यपालांच्या लोकभवनातील श्री गणरायाचे कृत्रिम हौदात विसर्जन
राज्यपालांच्या लोकभवनातील श्री गणरायाचे कृत्रिम हौदात विसर्जन

राज्यपालांच्या लोकभवनातील श्री गणरायाचे कृत्रिम हौदात विसर्जन

पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्तीच्या मातीत लावणार कडुनिंबाचे रोप

मुंबई : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या लोकभवन, मुंबई येथील निवासस्थानी विराजमान असलेल्या पाच दिवसांच्या श्री गणरायाचे शुक्रवारी कृत्रिम हौदात पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्यात आले. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या पुणे दौऱ्यामुळे राज्यपाल मुंबईबाहेर असल्याने लोकभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आरती करून बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.
राज्यपालांच्या सूचनेनुसार श्री गणेशमूर्तीचे विसर्जन निवासस्थानाबाहेर उभारण्यात आलेल्या कृत्रिम हौदात करण्यात आले. पर्यावरणस्नेही शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या या मूर्तीच्या विसर्जनानंतर मिळणाऱ्या मातीत कडुनिंबाचे रोप लावण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमातून गणेशोत्सव अधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी राज्यपालांचे सहसचिव एस. रामामूर्ती, परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे, जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांच्यासह लोकभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here