साहित्यमार्तंड यशवंतराव सावंत खास जीवनगौरव पुरस्कारासाठी पुस्तकांचे आवाहन

0
10
साहित्यमार्तंड यशवंतराव सावंत खास जीवनगौरव पुरस्कारासाठी पुस्तकांचे आवाहन
साहित्यमार्तंड यशवंतराव सावंत खास जीवनगौरव पुरस्कारासाठी पुस्तकांचे आवाहन

साहित्यमार्तंड यशवंतराव सावंत खास जीवनगौरव पुरस्कारासाठी पुस्तकांचे आवाहन

पाच साहित्यप्रकारांतील उत्कृष्ट पुस्तकांना प्रत्येकी २१ हजार रुपये; प्रवेश शुल्क नाही

पुणे :
साहित्यमार्तंड कविवर्य यशवंतराव सावंत खास यांच्या जयंतीनिमित्त यंदाच्या साहित्यमार्तंड यशवंतराव सावंत खास जीवनगौरव पुरस्कारासाठी विविध साहित्यप्रकारांतील उत्कृष्ट पुस्तकांची निवड करण्यात येणार आहे. मराठी साहित्याच्या विविध साहित्यप्रकारांना प्रोत्साहन देणे, नव्या लेखनाला व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि उत्कृष्ट साहित्यनिर्मितीचा सन्मान करणे हा या पुरस्कारामागील प्रमुख उद्देश आहे.
या पुरस्कारासाठी कादंबरी, कथासंग्रह, ललित लेखसंग्रह/प्रवासवर्णन, चरित्र/आत्मचरित्र/आत्मकथन आणि इतर गद्य या पाच साहित्यप्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक साहित्यप्रकारातील एका उत्कृष्ट पुस्तकाची निवड करून संबंधित लेखकाला २१ हजार रुपये रोख, मानपत्र आणि मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. या पाच पुरस्कारांची एकूण रक्कम १ लाख ५ हजार रुपये आहे.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी संबंधित साहित्याची प्रथम आवृत्ती १ जानेवारी २००० ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत प्रकाशित झालेली असणे आवश्यक आहे. इच्छुक लेखकांनी आपले पुस्तक ३० नोव्हेंबर २०२६पर्यंत पोस्टाने किंवा कुरिअरने प्राप्त होईल अशा पद्धतीने पाठवावे. यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही.
साहित्य पाठविण्याचा पत्ता : अजयसिंह यशवंतराव सावंत (सावंत खास), मु. पो. जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे, महाराष्ट्र – ४१२३०३. अधिक माहितीसाठी संपर्क : ९८८१२५४३४५.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here