राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांना विविध क्षेत्रातील महिला-भगिनींकडून रक्षाबंधन

0
10
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांना विविध क्षेत्रातील महिला-भगिनींकडून रक्षाबंधन
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांना विविध क्षेत्रातील महिला-भगिनींकडून रक्षाबंधन

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांना विविध क्षेत्रातील महिला-भगिनींकडून रक्षाबंधन

अनाथ, दिव्यांग मुलींसह स्वच्छता कर्मचारी व आदिवासी महिलांनी बांधली राखी; राज्यपालांकडून शुभेच्छा व भेटवस्तू

मुंबई :
अनाथ तसेच दिव्यांग मुली, महिला स्वच्छता कर्मचारी आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिला-भगिनींनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेऊन रक्षाबंधनानिमित्त त्यांना राखी बांधली.

यावेळी राज्यपालांनी सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत भेटवस्तू दिल्या. रक्षाबंधन हा समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारा पवित्र सण आहे. समाजाच्या विविध स्तरांवर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिला व मुलींसह यंदाचे रक्षाबंधन साजरे करताना अतिशय आनंद झाला, अशी भावना राज्यपालांनी व्यक्त केली.
विविध क्षेत्रांतील महिलांचा सहभाग
दिवंगत सिंधुताई सपकाळ यांनी सुरू केलेल्या ममता बाल सदन संस्थेच्या वतीने अनाथ मुलींनी राज्यपालांना राखी बांधली.
पालघर जिल्ह्यातील ‘सेवा विवेक’ ग्राम विकास केंद्राच्या वतीने बांबू उत्पादनाच्या माध्यमातून स्वयंरोजगार निर्माण करणाऱ्या आदिवासी महिलांनीही राज्यपालांना राखी बांधली.
तसेच ब्रह्माकुमारी संस्थेच्या नेपियन सी केंद्राच्या प्रमुख ब्रह्माकुमारी रुक्मिणी यांच्यासह ब्रह्माकुमारी बंधू-भगिनींनी राज्यपालांना राखी बांधून शुभेच्छा दिल्या व सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.
आर्य समाज, माटुंगा येथील शालेय विद्यार्थिनी तसेच नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (NAB) संस्थेच्या वतीने दृष्टिहीन मुलींनीही राज्यपालांना राखी बांधली.
विविध सामाजिक घटकांतील महिला आणि मुलींनी एकत्र येऊन साजरे केलेले हे रक्षाबंधन सामाजिक समता, बंधुभाव आणि एकात्मतेचा संदेश देणारे ठरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here