सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित

0
13
सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित
सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित

वेळेवर उपचार हाच जीव वाचविण्याचा मंत्र

मुंबई :
सर्पदंशामुळे होणारे मृत्यू आणि गंभीर आरोग्यविषयक परिणाम लक्षात घेता सर्पदंशाचा ‘अधिसूचित आजार’ म्हणून समावेश करण्यात आला आहे. सर्पदंशाच्या घटनांची तातडीने नोंद होणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविणे आणि उपचार व्यवस्थेत समन्वय वाढविणे, यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
सर्पदंश झाल्यास घाबरून न जाता त्वरित वैद्यकीय उपचार घेणे अत्यंत आवश्यक आहे. वेळेवर योग्य उपचार मिळाल्यास रुग्णाचा जीव वाचविण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते.
सर्पदंश झालेल्या व्यक्तीला शक्य तितक्या लवकर जवळच्या शासकीय किंवा मान्यताप्राप्त रुग्णालयात दाखल करावे. सर्पदंश झालेल्या व्यक्तीवर घरगुती उपचार, झाडपाल्याचे औषध किंवा इतर अप्रमाणित उपाय करण्याऐवजी वैद्यकीय उपचार घेण्यास प्राधान्य द्यावे.
‘सर्पदंश लपवू नका, वेळ वाया घालवू नका; तातडीने रुग्णालय गाठा’, हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here