रायगडच्या बाल गिर्यारोहक शर्विका म्हात्रेची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी भेट
रायगडच्या बाल गिर्यारोहक शर्विका म्हात्रेची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी भेट
पुणे :
रायगडची बाल गिर्यारोहक आणि विविध विक्रमांची मानकरी कु. शर्विका म्हात्रे हिने आपल्या कुटुंबीयांसह पुणे येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची जिजाई निवासस्थानी भेट घेतली.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शर्विकाशी संवाद साधत तिच्या गिर्यारोहण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची माहिती जाणून घेतली. तसेच तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अल्पवयातच शर्विकाने २०० हून अधिक गड-किल्ल्यांची भ्रमंती केली असून, विविध विक्रमांसह १०० हून अधिक पुरस्कार तिने मिळवले आहेत. जिद्द, धाडस आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर तिने गिर्यारोहण क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
शर्विकाची ही कामगिरी युवा पिढीसाठी प्रेरणादायी असून, तिच्यासारख्या युवा खेळाडूंना प्रोत्साहन आणि योग्य व्यासपीठ मिळाल्यास महाराष्ट्राच्या क्रीडा व साहसी क्षेत्राला आणखी मोठी उंची मिळेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.