रायगड जिल्ह्यात फळपीक विमा योजनेसाठी ३१ ऑक्टोबर अंतिम मुदत; नारळ व सुपारी उत्पादकांना आवाहन

0
8
रायगड जिल्ह्यात फळपीक विमा योजनेसाठी ३१ ऑक्टोबर अंतिम मुदत
रायगड जिल्ह्यात फळपीक विमा योजनेसाठी ३१ ऑक्टोबर अंतिम मुदत

रायगड जिल्ह्यात फळपीक विमा योजनेसाठी ३१ ऑक्टोबर अंतिम मुदत; नारळ व सुपारी उत्पादकांना आवाहन

रायगड :
रायगड जिल्ह्यातील नारळ आणि सुपारी उत्पादक शेतकऱ्यांसाठी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ ऑक्टोबर २०२६ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. हवामानातील प्रतिकूल बदलांमुळे फळपिकांचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेता, शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वी विमा नोंदणी करून आपल्या पिकांना विमा संरक्षण मिळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेअंतर्गत नारळ पिकासाठी प्रति हेक्टर ₹६,८००, तर सुपारी पिकासाठी प्रति हेक्टर ₹४,००० इतका विमा हप्ता नमूद करण्यात आला आहे.
विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांकडे Farmer ID आणि ई-पीक पाहणीची नोंद असणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे आणि नोंदींची पूर्तता करून अंतिम मुदतीपूर्वी अर्ज सादर करावा.
विमा नोंदणी व योजनेविषयी अधिक माहितीसाठी शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.
हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानापासून फळपिकांना विमा संरक्षण मिळविण्यासाठी रायगड जिल्ह्यातील पात्र नारळ व सुपारी उत्पादक शेतकऱ्यांनी वेळेत नोंदणी करावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here