रायगड पोलिसांचे अनोखे रक्षाबंधन; झाडांना राखी बांधून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

0
10

रायगड :
रक्षाबंधनाच्या पारंपरिक सणाला पर्यावरण संवर्धनाची जोड देत रायगड पोलिसांनी अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले. ‘एक राखी, पर्यावरणासाठी’ या अभिनव उपक्रमातून झाडांना राखी बांधून निसर्गाशी असलेले नाते अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला.
राखीच्या पवित्र धाग्यातून झाडांच्या संरक्षणाची भावना जागृत करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. झाडे ही केवळ निसर्गाचा अविभाज्य घटक नसून मानवी जीवनाच्या अस्तित्वासाठी अत्यावश्यक आहेत, याची जाणीव नागरिकांमध्ये निर्माण करण्याचा संदेश रायगड पोलिसांनी दिला.
“झाडांचे रक्षण करा, झाडेच आपल्या भविष्याचे रक्षण करतील,” असा पर्यावरण संवर्धनाचा संदेश यावेळी देण्यात आला.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने झाडांना राखी बांधण्याच्या या उपक्रमातून पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि निसर्गाप्रती जबाबदारीची भावना समाजात रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. रायगड पोलिसांच्या या उपक्रमाचे पर्यावरणप्रेमींकडून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here