‘प्रो गोविंदा लीग’च्या सीझन ४ दहीहंडी उत्सवाला मंत्री उदय सामंत यांची भेट

0
16
‘प्रो गोविंदा लीग’च्या सीझन ४ दहीहंडी उत्सवाला मंत्री उदय सामंत यांची भेट
‘प्रो गोविंदा लीग’च्या सीझन ४ दहीहंडी उत्सवाला मंत्री उदय सामंत यांची भेट

‘प्रो गोविंदा लीग’च्या सीझन ४ दहीहंडी उत्सवाला मंत्री उदय सामंत यांची भेट

मुंबई :
युवासेना कार्याध्यक्ष श्री. पूर्वेश प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारातून गेल्या तीन वर्षांपासून आयोजित करण्यात येत असलेल्या ‘प्रो गोविंदा लीग’च्या सीझन ४ दहीहंडी उत्सवाला मंत्री उदय सामंत यांनी वरळी येथील एस. व्ही. पी. स्टेडियम डोम येथे भेट देऊन गोविंदा पथकांचा उत्साह वाढविला.

यावेळी बोलताना उदय सामंत म्हणाले की, दहीहंडी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग आहे. हा उत्सव आता केवळ सणापुरता मर्यादित राहिलेला नसून तरुणांच्या शिस्तीचा, धैर्याचा आणि संघटित शक्तीचा महासोहळा बनला आहे. या पारंपरिक खेळाला आधुनिक आणि व्यावसायिक मंच उपलब्ध करून देत जागतिक स्तरावर नवी ओळख निर्माण करण्याचे काम पूर्वेश सरनाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे, असे त्यांनी सांगितले.
‘प्रो गोविंदा लीग’च्या सीझन ४ च्या मंचावर उपस्थित राहून विविध गोविंदा पथकांचा उत्साह पाहताना आनंद होत असल्याचेही सामंत यांनी नमूद केले. दहीहंडीच्या या उत्सवात सहभागी झालेल्या सर्व गोविंदा पथकांना तसेच आयोजकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
आधुनिक स्वरूपातील स्पर्धात्मक आयोजनामुळे पारंपरिक दहीहंडीला नवे व्यासपीठ मिळत असून, युवा पिढीमध्ये संघभावना, शिस्त आणि साहसाची भावना निर्माण करण्यास अशा उपक्रमांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here