राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गटांच्या एकत्रीकरणाची शक्यता; चर्चांना अंतिम टप्पा

0
343

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील विरोधी असलेले दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आला असून या चर्चा आता अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे संकेत मिळत आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गटातील प्रमुख नेते जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत आज मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, पवार गटाची साथ सोडण्याची शक्यता वाढली असून, गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या अंतर्गत चर्चा निर्णायक टप्प्यावर आहेत. वरिष्ठ पातळीवर सुरू असलेल्या बैठका आणि हालचालींमुळे राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आगामी राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले असून, या चर्चांना लवकरच अंतिम स्वरूप मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here