रिक्षा संपावरून अविनाश जाधव यांचा इशारा; “१ मे रोजी संप करा, अन्यथा आम्ही पर्याय उभा करू”
मुंबई : प्रतिनिधी
रिक्षा संपाच्या चर्चांवरून मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी तीव्र प्रतिक्रिया देत काही घटकांकडून खोटे आकडे पसरवून राज्यातील वातावरण बिघडवण्याचा आरोप केला आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात सुमारे ४ लाख रिक्षा असून त्यातील ६०-६५ टक्के चालक मराठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रिक्षा संपाबाबत १५ लाखांचा आकडा सांगितला जात असल्यावर प्रश्न उपस्थित करत, “१ मे रोजी संप करायचा असेल तर करा, अन्यथा आम्हाला काही फरक पडणार नाही. आवश्यक असल्यास आम्ही स्वतःच्या गाड्यांद्वारे नागरिकांना त्यांच्या घरी पोहोचवू,” असा इशारा त्यांनी दिला. तसेच महाराष्ट्रात आव्हान देण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील, असेही त्यांनी म्हटले.
दरम्यान, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा हक्क बजावण्यापूर्वी जाधव यांनी विद्या प्रतिष्ठान येथे अजितदादांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन आदरांजली वाहिली.


