लाडक्या बहिणींनो… E-KYC तात्काळ पूर्ण करा
अंतिम मुदतीचे केवळ ३ दिवस शिल्लक
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक योजना असून, या योजनेचा लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी E-KYC प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. शासनाच्या निर्देशानुसार ३१ डिसेंबर २०२५ ही E-KYC पूर्ण करण्याची अंतिम तारीख असून, आता केवळ शेवटचे ३ दिवस शिल्लक राहिले आहेत.
ज्या लाभार्थी महिलांनी अद्याप E-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना पुढील हप्त्यांचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात किंवा लाभ तात्पुरता थांबवण्यात येऊ शकतो. त्यामुळे कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी आजच E-KYC प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे.
E-KYC प्रक्रिया ही सोपी असून, ती आधार कार्डच्या माध्यमातून अधिकृत केंद्रांवर, CSC सेंटर, सेतू कार्यालय किंवा शासनाने दिलेल्या ऑनलाइन सुविधांद्वारे करता येते. प्रक्रिया पूर्ण करताना आधार कार्ड, मोबाईल नंबर (आधारशी लिंक असलेला) आणि आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत.
ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबवण्यात येत असून, दरमहा मिळणारा लाभ हा अनेक कुटुंबांचा आधार आहे. त्यामुळे कोणतीही महिला या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने वारंवार आवाहन केले आहे.
तरी सर्व लाडक्या बहिणींनी वेळ न दवडता, शेवटच्या क्षणाची वाट न पाहता, तात्काळ आपली E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी, असे नम्र आवाहन करण्यात येत आहे. वेळेत प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ अखंडपणे सुरू ठेवा.


