लालबागच्या राजाचे आज सायंकाळी ७ वाजता प्रथम दर्शन!
लालबागच्या राजाचे आज सायंकाळी ७ वाजता प्रथम दर्शन!
वर्ष ९३ वे; लालबाग मार्केटमध्ये मीडिया प्रतिनिधींसाठी विशेष फोटोसेशनचे आयोजन
मुंबई :
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे यंदाचा ९३ वा भाद्रपद गणेशोत्सव सोमवार, १४ सप्टेंबर ते शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
गणेशोत्सव सोहळ्यापूर्वी ‘लालबागचा राजा २०२६’चे प्रथम दर्शन शुक्रवार, ११ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ठीक ७ वाजता लालबाग मार्केट येथे घडविण्यात येणार आहे. यावेळी सर्व मीडिया प्रतिनिधींसाठी विशेष फोटोसेशनचे आयोजन करण्यात आले आहे.
मंडळाने मीडिया प्रतिनिधींसाठी फोटोशूटची विशेष व्यवस्था केली असून, नियोजित ठिकाणावरूनच छायाचित्रण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. फोटोसेशनदरम्यान मंडळाचे कार्यकर्ते मीडिया प्रतिनिधींना नियोजनासाठी सहकार्य करणार आहेत.
न्यूज कव्हरेजसाठी येणाऱ्या सर्व मीडिया प्रतिनिधींनी आपल्या वृत्तपत्र अथवा न्यूज चॅनेलचे प्रेस आयडी सोबत ठेवणे आवश्यक आहे. वैध प्रेस आयडी असलेल्या प्रतिनिधींनाच मीडिया स्टेजवर प्रवेश देण्यात येणार आहे.
दरम्यान, ‘लालबागचा राजा २०२६’चे प्रथम दर्शन मंडळाच्या अधिकृत वेबसाइट, YouTube, Facebook, Instagram तसेच iOS आणि Android App वरही घेता येणार आहे.
— बाळासाहेब कांबळे, अध्यक्ष
— सुधीर सीताराम साळवी, मानद सचिव
— मंगेश दत्ताराम दळवी, खजिनदार
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ