लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे विद्यार्थ्यांसाठी ‘ग्रह-ताऱ्यांची सफर’

0
18

१९ डिसेंबरला मोफत शैक्षणिक सहल

मुंबई :
लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेश गल्ली यांच्या वतीने मंडळाच्या अंतर्गत विभागातील वर्गणीदार रहिवाशांच्या मुलांसाठी ‘ग्रह-ताऱ्यांची सफर’ या संकल्पनेवर आधारित मोफत शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. १९ डिसेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता ही सहल आयोजित करण्यात येणार आहे.
या सहलीसाठी नेहरू तारांगण आणि नेहरू म्युझियम ही ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी होता येणार आहे. विद्यार्थ्यांना विज्ञान, खगोलशास्त्र आणि अवकाशविषयक माहिती प्रत्यक्ष अनुभवातून मिळावी, हा या शैक्षणिक सहलीमागील उद्देश आहे.
इच्छुक पालकांनी आपल्या पाल्यांची नोंदणी दि. १ डिसेंबर ते १० डिसेंबर २०२६ या कालावधीत करावी. नोंदणीची वेळ सायंकाळी ७ ते रात्री ९ अशी असून, नोंदणी केंद्र ‘मुंबईचा राजा’ मुख्य कार्यालय, गणेश गल्ली, लालबाग, मुंबई-४०००१२ येथे आहे.
या सहलीचा प्रवेश केवळ उत्सव मंडळाच्या अंतर्गत विभागातील रहिवाशांच्या मुलांसाठीच खुला आहे. त्यामुळे पात्र पालकांनी दिलेल्या कालावधीत नोंदणी करून या मोफत शैक्षणिक उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here