श्री एकविरा देवी देवस्थान परिसराचा विकास करणार – वनमंत्री गणेश नाईक 

0
15
श्री एकविरा देवी देवस्थान परिसराचा विकास करणार - वनमंत्री गणेश नाईक 
श्री एकविरा देवी देवस्थान परिसराचा विकास करणार - वनमंत्री गणेश नाईक 

श्री एकविरा देवी देवस्थान परिसराचा विकास करणार – वनमंत्री गणेश नाईक 

वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात आढावा बैठक

पुणे :
श्री एकविरा देवीच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. या पार्श्वभूमीवर एकविरा देवस्थान परिसराचे सुशोभीकरण, पायाभूत सुविधांचा विकास आणि भाविकांना अधिक चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पुणे येथे आढावा बैठक घेण्यात आली. वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
या बैठकीत देवस्थान परिसरातील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वाहतूक नियोजन, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुविधा तसेच परिसराच्या नियोजनबद्ध विकासाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि सुखकर दर्शनाचा अनुभव मिळावा, यासाठी आवश्यक उपाययोजनांना प्राधान्य देण्यावर बैठकीत भर देण्यात आला. तसेच या पवित्र देवस्थान परिसराचा विकास अधिक दर्जेदार पद्धतीने करण्यासाठी पायाभूत सुविधांचे नियोजन आणि सुशोभीकरणाची कामे करण्याबाबत आढावा घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here