लोकलमध्ये दसऱ्याचा उत्साह! छत्रपती शिवराय रेल्वे प्रवासी भजन मंडळातर्फे रेल्वेचे पूजन; मोटरमन यांचा सन्मान

0
6

मुंबई :
दैनंदिन प्रवासाच्या धावपळीतही भारतीय संस्कृती आणि सण-उत्सवांची परंपरा जपण्याचा अनोखा उपक्रम छत्रपती शिवराय रेल्वे प्रवासी भजन मंडळातर्फे राबविण्यात आला. वाशी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) दरम्यान धावणाऱ्या सकाळी ८.१३ वाजताच्या लोकलमध्ये दसरा सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी रेल्वेला तोरण बांधून विधिवत पूजन करण्यात आले, तसेच रेल्वे सुरक्षितपणे चालविण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या मोटरमन यांचा सन्मान करण्यात आला.

भजनातून भक्ती आणि सामाजिक एकोपा
छत्रपती शिवराय रेल्वे प्रवासी भजन मंडळ रेल्वे प्रवाशांमध्ये भक्तिभाव, सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक एकोपा जपण्याचे कार्य करत आहे. मंडळ हार्बर, मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवरील भजन स्पर्धांमध्ये सहभागी होत असून, या स्पर्धांमध्ये मंडळाने पहिल्या तीन क्रमांकांमध्ये स्थान मिळविले आहे. भजनाच्या माध्यमातून भक्ती, संस्कृती आणि एकतेचा संदेश देण्याचे कार्य मंडळ सातत्याने करत आहे.
रेल्वे कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता
दसऱ्यानिमित्त रेल्वेचे पूजन करून मोटरमन यांचा सन्मान करण्याचा उपक्रम प्रवाशांमध्ये उत्साह आणि भक्तिमय वातावरण निर्माण करणारा ठरला. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच प्रवासादरम्यान सांस्कृतिक परंपरा जपण्याचा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला.
या कार्यक्रमाला मंडळाचे संस्थापक महाडिक बुवा, अध्यक्ष अनिल मोरे, माजी अध्यक्ष सोपान मालुसरे, कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. शैलेश चंद्रकांत गोळे आणि मंडळाचे सर्व सभासद उपस्थित होते. सर्वांच्या सहभागातून दसरा सण आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here