लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या १६ व्या स्मृतिदिनानिमित्त वाशीत कोळीगीतांचा सांस्कृतिक जल्लोष

0
7

लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृतिदिनानिमित्त वाशी येथे ‘कोळीगीतांच्या कोळीवाऱ्यात, ये दादा आवर ये’ कार्यक्रमाचे आयोजन

वाशी :
लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या १६ व्या स्मृतिदिनानिमित्त लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटरच्या वतीने वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात ‘कोळीगीतांच्या कोळीवाऱ्यात, ये दादा आवर ये’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेचा आणि कोळी संस्कृतीचा मनमोहक आविष्कार रसिकांना अनुभवायला मिळाला.

लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी आपल्या प्रभावी लेखणीतून आणि दमदार आवाजातून अजरामर केलेल्या अस्सल कोळीगीतांचा नृत्याविष्कार यावेळी सादर करण्यात आला. या गीतांच्या माध्यमातून कोळी समाजाची संस्कृती, परंपरा आणि लोकजीवनाचे दर्शन घडले.
या कार्यक्रमाला उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहन दिले. लोककलेचा वारसा जपणाऱ्या आणि आपल्या कलेच्या माध्यमातून जनमानसात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या लोकशाहीर विठ्ठल उमप यांना यावेळी विनम्र अभिवादन केले, असे मंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here