वंदना चौधरी यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती

0
49

राष्ट्रवादी महिला काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) यांच्या प्रदेश सरचिटणीसपदी श्रीमती वंदना चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष संघटन अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पक्ष सूत्रांनी दिली.

वंदना चौधरी या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असून महिला सक्षमीकरण, संघटन बांधणी आणि जनसंपर्क या क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या अनुभवाचा व कार्यतत्परतेचा लाभ पक्ष संघटनेला होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

या नियुक्तीमुळे महिला आघाडीच्या संघटनात्मक कामकाजाला अधिक गती मिळणार असून राज्यभरात पक्ष विस्तारासाठी नव्या उपक्रमांना चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here