
वनसेवा मुख्य परीक्षा-२०२४ मुलाखतीसाठी अनुसूचित जातीच्या उमेदवारांना आर्टीकडून १० हजारांचे आर्थिक सहाय्य
मुंबई l प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ‘वनसेवा मुख्य परीक्षा – २०२४’ मध्ये उत्तीर्ण होऊन मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या अनुसूचित जातीतील मातंग व तत्सम प्रवर्गातील उमेदवारांसाठी अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी)तर्फे महत्त्वाची योजना जाहीर करण्यात आली आहे.या योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांना एकरकमी १० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाणार असून, मुलाखत तयारीसाठी ही मोठी मदत ठरणार आहे. संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांनी पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी आर्टीच्या संकेतस्थळावरील NOTICE BOARD विभागात तपशील पाहावा.
संकेतस्थळ : https://arti.org.in
तसेच अर्ज करण्यासाठी खालील गुगल फॉर्म लिंकवर भरावा :
https://forms.gle/BSh7vMVDNonGK4C18
या आर्थिक सहाय्यामुळे मुलाखत तयारीसाठी उत्सुक असलेल्या उमेदवारांना प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळणार आहे.

