वन महोत्सव २०२६ – महाराष्ट्र वन विभागाकडून सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध; ३० सप्टेंबरपर्यंत संधी

0
15
वन महोत्सव २०२६ - महाराष्ट्र वन विभागाकडून सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध; ३० सप्टेंबरपर्यंत संधी
वन महोत्सव २०२६ - महाराष्ट्र वन विभागाकडून सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध; ३० सप्टेंबरपर्यंत संधी
वन महोत्सव २०२६ – महाराष्ट्र वन विभागाकडून सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध; ३० सप्टेंबरपर्यंत संधी

मुंबई, दि. ३० : राज्यात हरित क्षेत्र वाढविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र वन विभागामार्फत १५ जून ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत वन महोत्सव २०२६ आयोजित करण्यात आला असून या कालावधीत नागरिकांना विविध प्रकारची रोपे सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

“हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र” या संकल्पनेला बळ देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करून पर्यावरण संवर्धनात सहभाग नोंदवावा, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

वन महोत्सवादरम्यान उपलब्ध असलेल्या विविध रोपांच्या विक्री दरांची माहिती, रोपांचे प्रकार तसेच इतर आवश्यक माहिती जाणून घेण्यासाठी वन विभागाने उपलब्ध करून दिलेला QR कोड स्कॅन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वन विभागाच्या या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि हरित क्षेत्र वाढीस चालना मिळणार असून नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असेही वन विभागाने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here