वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानचा आजपासून २७ वा त्रिसूत्री संगीत महोत्सव; तीन दिवस सुरांची मेजवानी

0
7
वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानचा आजपासून २७ वा त्रिसूत्री संगीत महोत्सव
वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानचा आजपासून २७ वा त्रिसूत्री संगीत महोत्सव

वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानचा आजपासून २७ वा त्रिसूत्री संगीत महोत्सव; तीन दिवस सुरांची मेजवानी

कणकवली :
वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवली यांच्यावतीने २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान प्रतिष्ठानच्या नाट्यमंदिरात २७ व्या त्रिसूत्री संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. वामनदाजी शास्त्रोक्त गायन स्पर्धा, शास्त्रोक्त संगीत रसग्रहण कार्यशाळा आणि पं. जितेंद्र अभिषेकी स्मृती संगीत महोत्सव अशी या महोत्सवाची त्रिसूत्री आहे.
महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता नगराध्यक्ष संदेश पारकर आणि मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सुयोग कुंडलकर, आरती कुंडलकर, पं. जितेंद्र अभिषेकी सघनगान केंद्राचे गुरु पं. डॉ. समीर दुबळे आणि चारुदत्त फडके
आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत वामनदाजी शास्त्रोक्त गायन स्पर्धा होईल. सायंकाळी ७ ते ९.३० या वेळेत स्पर्धेतील विजेत्यांचे गायन, पं. जितेंद्र अभिषेकी सघनगान केंद्राची विद्यार्थिनी ऋचा पिळणकर हिचे गायन आणि पं. डॉ. अरविंद थत्ते यांचे शिष्य सुयोग कुंडलकर यांचे एकल संवादिनी वादन होणार आहे.
शनिवार, २१ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५.३० या वेळेत पं. प्रभा अत्रे यांच्या बंदिशींवर आधारित आरती कुंडलकर यांची रसग्रहण कार्यशाळा होईल. सायंकाळी ७ ते ७.४० या वेळेत संस्थेच्या तबला प्रशिक्षण केंद्राचा विद्यार्थी अभिनव जोशी याचे एकल तबलावादन होणार आहे. रात्री ८ ते ९.३० या वेळेत पं. माणिक भिडे आणि पं. रत्नाकर पै यांच्या शिष्या, पद्मश्री अश्विनी भिडे-देशपांडे यांचे शास्त्रोक्त गायन होईल.
रविवार, २२ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी १.३० या वेळेत रसग्रहण कार्यशाळा होणार आहे. सायंकाळी ६ ते ७ या वेळेत पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या नाट्यपदांचा ‘संगीत सुर सरस’ हा कार्यक्रम सादर होईल. यामध्ये निलेश धाक्रस, ईश्वरी तेजम, पल्लवी पिळणकर, श्रुती सावंत आणि पांडुरंग सुतार सहभागी होणार आहेत. सायंकाळी ७ ते ८ या वेळेत पं. शमा भाटे यांच्या शिष्या श्रेया कुलकर्णी आणि प्रमोद वाघ यांचे कथ्थक नृत्य सादर होईल. रात्री ८.१५ ते ९.३० या वेळेत पं. प्रभा अत्रे यांच्या शिष्या आरती कुंडलकर यांचे शास्त्रोक्त गायन होणार आहे.
या तीन दिवसीय संगीत महोत्सवाचा संगीतप्रेमी आणि रसिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here