सेना भवनाबाहेर ठाकरे गटाचे आंदोलन; माजी महापौर श्रद्धा जाधव पोलिसांशी झटापटीत खाली कोसळल्या
सेना भवनाबाहेर ठाकरे गटाचे आंदोलन; माजी महापौर श्रद्धा जाधव पोलिसांशी झटापटीत खाली कोसळल्या
मुंबई:
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याच्या निषेधार्थ शायना एन. सी. यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून दादर येथील सेना भवनाबाहेर निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलकांना पोलिसांकडून ताब्यात घेतले जात असताना माजी महापौर श्रद्धा जाधव आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. या झटापटीदरम्यान श्रद्धा जाधव यांच्यासह एक महिला पोलीस कर्मचारी खाली कोसळल्या. या घटनेत श्रद्धा जाधव यांना दुखापत झाल्याचे दिसून आले.
या घटनेनंतर सेना भवनाबाहेर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.