रायगडमध्ये तरुणांना मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; १० दिवसांचे निवासी प्रशिक्षण

0
7
रायगडमध्ये तरुणांना मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; १० दिवसांचे निवासी प्रशिक्षण
रायगडमध्ये तरुणांना मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; १० दिवसांचे निवासी प्रशिक्षण

रायगडमध्ये तरुणांना मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; १० दिवसांचे निवासी प्रशिक्षण

रायगड :
शेती, सर्वेक्षण, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी आणि आपत्ती व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रांत ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाचे कौशल्य तरुणांना आत्मसात करता यावे आणि रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी अमृत संस्थेमार्फत १० दिवसांचे निवासी ड्रोन पायलट प्रशिक्षण मोफत देण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणामध्ये ड्रोन उड्डाणाचे प्रात्यक्षिक आणि तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) नियमांची माहिती आणि सुरक्षित उड्डाणाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रशिक्षण, निवास आणि भोजनाची व्यवस्था विनामूल्य असेल. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर अधिकृत ड्रोन पायलट परवाना मिळविण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पात्रता काय?
या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील लक्ष्यित जातींचे उमेदवार अर्ज करू शकतात. अर्जदाराचे वय १८ ते ५५ वर्षांच्या दरम्यान असावे. किमान बारावी उत्तीर्ण असणे आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. शेतकरी कुटुंबातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
अर्ज आणि संपर्क
इच्छुक उमेदवारांनी अमृत रायगड जिल्हा कार्यालय, अलिबाग येथे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी शैलेश मराठे (९११२२२८७५९) किंवा मंगेश ढेबे (८१४९५५२१४३) यांच्याशी संपर्क साधता येईल.
ऑनलाइन अर्ज आणि योजनेची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अमृत रायगड जिल्हा कार्यालय, अलिबाग
संपर्क :
शैलेश मराठे – 9112228759 / मंगेश ढेबे – 8149552143
ऑनलाइन अर्ज व योजनेची सविस्तर माहिती :
https://app.mahaamrut.org.in/amrut-new/scheme/245
आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाचे कौशल्य आत्मसात करून रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याची ही तरुणांसाठी महत्त्वपूर्ण संधी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here