रत्नागिरी जिल्हा क्रीडा पुरस्कार २०२५-२६ साठी अर्ज मागविले; १० डिसेंबर अंतिम मुदत

0
8
रत्नागिरी जिल्हा क्रीडा पुरस्कार २०२५-२६ साठी अर्ज मागविले; १० डिसेंबर अंतिम मुदत
रत्नागिरी जिल्हा क्रीडा पुरस्कार २०२५-२६ साठी अर्ज मागविले; १० डिसेंबर अंतिम मुदत

रत्नागिरी जिल्हा क्रीडा पुरस्कार २०२५-२६ साठी अर्ज मागविले; १० डिसेंबर अंतिम मुदत

रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूंची कामगिरी आणि क्रीडा मार्गदर्शकांचे योगदान गौरवण्यासाठी, तसेच क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत दरवर्षी जिल्हा क्रीडा पुरस्कार दिले जातात.
सन २०२५-२६ च्या जिल्हा क्रीडा पुरस्कारांसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत पात्र खेळाडू व क्रीडा मार्गदर्शकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी दि. १० डिसेंबर २०२६ पर्यंत परिपूर्ण अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.
पुरस्काराचे स्वरूप
सन २००२ पासून दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह आणि १०,००० रुपये रोख असे आहे. याअंतर्गत चार विविध विभागांत पुरस्कार दिले जातील.
उत्कृष्ट खेळाडू — एक पुरुष खेळाडू, एक महिला खेळाडू आणि एक दिव्यांग खेळाडू (पुरुष किंवा महिला).
गुणवंत क्रीडा मार्गदर्शक — एक क्रीडा मार्गदर्शक
पुरस्कारासाठी संबंधित पुरस्कार वर्षातील १ जुलै ते ३० जून या कालावधीतील कामगिरी ग्राह्य धरली जाईल.
पात्र खेळांची यादी
एकूण ४४ मान्यताप्राप्त खेळांचा समावेश या पुरस्कारासाठी आहे. त्यात धनुर्विद्या, मैदानी क्रीडा स्पर्धा (ॲथलेटिक्स), बॅडमिंटन, बिलियर्ड्स अँड स्नूकर, कॅरम, बुद्धिबळ, सायकलिंग, तलवारबाजी, गोल्फ, जिम्नॅस्टिक, अश्वारोहण, लॉनटेनिस, मल्लखांब, नेमबाजी, स्केटिंग, स्क्वॅश, जलतरण, टेबल टेनिस, ट्रायथलॉन आणि आट्यापाट्या यांचा समावेश आहे.
तसेच बास्केटबॉल, शरीरसौष्ठव, बॉक्सिंग, क्रिकेट, फुटबॉल, हँडबॉल, हॉकी, ज्युदो, कबड्डी, कयाकिंग-कनोईंग, खो-खो, भारोत्तोलन, रोईंग, तायक्वाँदो, व्हॉलीबॉल, कुस्ती, वुशू, याटिंग, सॉफ्टबॉल, रग्बी, मॉडर्न पेंटॅथलॉन, बेसबॉल आणि स्पोर्ट क्लायंबिंग या खेळांसाठीही अर्ज करता येतील.
खेळाडूंसाठी निकष
अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग १५ वर्षे वास्तव्य असणे आवश्यक आहे.
खेळाडूने पुरस्कार वर्षासह लगतपूर्व पाच वर्षांपैकी किमान दोन वर्षे रत्नागिरी जिल्ह्याचे अधिकृत स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व केलेले असावे. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील वरिष्ठ, कनिष्ठ, शालेय किंवा केंद्र शासनाच्या स्पर्धांमधील मागील पाच वर्षांपैकी सर्वोत्कृष्ट तीन वर्षांची कामगिरी विचारात घेतली जाईल.
अर्जासोबत अधिकृत जिल्हा संघटनेचे शिफारस पत्र जोडणे आवश्यक आहे. अपवादात्मक परिस्थितीत वैयक्तिक अर्ज स्वीकारला जाऊ शकतो. तसेच मूळ प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडणे अनिवार्य आहे.
दिव्यांग खेळाडूंसाठी ज्युनिअर वर्ल्ड पॅरा, आशियाई पॅरा (कनिष्ठ), कॉमनवेल्थ पॅरा (कनिष्ठ), वरिष्ठ व कनिष्ठ पॅरा राष्ट्रीय अजिंक्यपद, तसेच वरिष्ठ, कनिष्ठ व जिल्हा पॅरा अजिंक्यपद स्पर्धांमधील कामगिरी ग्राह्य धरली जाईल.
मार्गदर्शकांसाठी निकष
क्रीडा मार्गदर्शकासाठी अर्जदाराने वयाची ३५ वर्षे पूर्ण केलेली असावीत आणि महाराष्ट्रात सतत १० वर्षे क्रीडा मार्गदर्शनाचे कार्य केलेले असावे.
संबंधित मार्गदर्शकाने रत्नागिरी जिल्ह्यातील खेळाडू घडवलेले असावेत. नॅशनल गेम्स, वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा किंवा राज्य/जिल्हा स्पर्धेत प्रथम तीन क्रमांक मिळवणारे किमान तीन खेळाडू घडवलेले असावेत.
तसेच मागील १० वर्षांत राज्य, राष्ट्रीय व खेलो इंडिया पदक विजेते खेळाडू घडवलेले असणे आवश्यक आहे.
अर्जासोबत संबंधित खेळाडूंचे विहित नमुन्यातील हमीपत्र जोडणे आवश्यक आहे. एका जिल्ह्यात किंवा एका प्रवर्गात पुरस्कार मिळालेली व्यक्ती पुन्हा अर्ज करण्यास पात्र राहणार नाही.
अर्ज कुठे सादर करावा :
विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, बाफना मोटर्सजवळ, एम.आय.डी.सी., मिरजोळे, ता. जि. रत्नागिरी येथून कार्यालयीन वेळेत प्राप्त करून घ्यावेत. परिपूर्ण भरलेले अर्ज दि. १० डिसेंबर २०२६ पर्यंत याच कार्यालयात सादर करावेत.
विहित मुदतीनंतर येणारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here