वाकण ग्रामपंचायतीचा ‘सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत’ पुरस्काराने गौरव
पोलादपुर :
पोलादपुर पंचायत समिती (Poladpur Panchayat Samiti ) अंतर्गत येणाऱ्या वाकण (Wakan ) ग्रामपंचायतीला महाआवास अभियान सन २०२३-२४ अंतर्गत उभारण्यात आलेल्या बहुमजली इमारतीसाठी ‘सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत’ विभागातील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शुक्रवारी सातारा येथे पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात हा सन्मान देण्यात आला. ग्रामविकास आणि ग्रामीण भागातील दर्जेदार गृहनिर्माण उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार महत्त्वाचा मानला जात आहे.
महाआवास अभियानांतर्गत उभारण्यात आलेल्या या इमारतीच्या दर्जेदार बांधकाम, नियोजन आणि सुविधांची दखल घेत वाकण ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली. या यशामुळे ग्रामपंचायत क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


