वाशिष्ठीसह रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांमधील गाळ उपशाबाबत चिपळुणात महत्त्वपूर्ण बैठक

0
2

पूरस्थितीचा धोका कमी करण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा; पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत आढावा

चिपळूण : र
त्नागिरी जिल्ह्यातील वाशिष्ठी नदीसह अन्य नद्यांमधील गाळ उपशाच्या कामासंदर्भात पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत चिपळूण येथे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. नद्यांमध्ये साचलेल्या गाळामुळे निर्माण होणाऱ्या समस्या, पावसाळ्यात उद्भवू शकणारी संभाव्य पूरस्थिती आणि गाळ उपशाच्या कामाच्या नियोजनाबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
नद्यांची पाणीवहन क्षमता वाढवणे, पूरस्थितीचा धोका कमी करणे आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे या दृष्टीने गाळ उपशाची कामे प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता यावेळी अधोरेखित करण्यात आली. या अनुषंगाने संबंधित शासकीय विभाग, नाम फाऊंडेशन आणि स्थानिक प्रतिनिधी यांच्याशी विविध उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली.
या बैठकीला रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल, चिपळूणचे प्रांताधिकारी आकाश लिगाडे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता, जलसंपदा यांत्रिकी विभाग अलोरेचे कार्यकारी अभियंता, नाम फाऊंडेशनचे पदाधिकारी, चिपळूण बचाव समितीचे प्रतिनिधी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here