वाशी येथे वनमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबारात ४०० हून अधिक निवेदने प्राप्त

0
3

नवी मुंबईसह विविध भागांतील नागरिकांनी मांडल्या सार्वजनिक समस्या; संबंधित विभागांकडून प्रश्न सोडविण्याचे निर्देश

वाशी :
वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. या जनता दरबारात नवी मुंबईसह विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी आपल्या सार्वजनिक समस्या आणि प्रलंबित प्रश्नांबाबत निवेदने सादर केली. यावेळी ४०० हून अधिक निवेदने प्राप्त झाली.

नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेऊन त्यावर योग्य तोडगा काढणे, संबंधित शासकीय विभागांच्या माध्यमातून प्रश्नांचा पाठपुरावा करणे तसेच प्रलंबित कामांना गती देणे, हा जनता दरबार आयोजित करण्यामागील मुख्य उद्देश होता. विविध विषयांशी संबंधित नागरिकांनी यावेळी आपल्या अडचणी मांडत प्रशासनाकडे कार्यवाहीची मागणी केली.
जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन नागरिकांच्या अडचणींचे वेळेत निराकरण होण्यासाठी संबंधित प्रशासकीय विभागांनी तत्परतेने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
नागरिकांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी जनतेशी थेट संवाद साधण्याची आणि त्यांच्या समस्यांच्या निवारणासाठी पाठपुरावा करण्याची प्रक्रिया यापुढेही सातत्याने सुरू राहील, असे मत मंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here