‘विकसित भारत युथ पार्लमेंट’मध्ये युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे -जिल्हाधिकारी मनुज जिंदल
‘विकसित भारत युथ पार्लमेंट’मध्ये युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे -जिल्हाधिकारी मनुज जिंदल
रत्नागिरी :
भारत सरकारच्या वतीने १८ ते २५ वयोगटातील युवकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘विकसित भारत युथ पार्लमेंट २०२४’ या विशेष उपक्रमात रत्नागिरी जिल्ह्यातील युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.
या उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून, जिल्ह्यातील तरुणांना आपले विचार, मते आणि दृष्टिकोन प्रभावीपणे मांडण्यासाठी या माध्यमातून संधी उपलब्ध होणार आहे. विकसित भारताच्या संकल्पनेत युवकांचा सहभाग महत्त्वाचा असून, देशाच्या विकासप्रक्रियेत तरुणांनी सक्रिय भूमिका बजावावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
युवकांमधील नेतृत्वगुण, वक्तृत्वकौशल्य, वैचारिक क्षमता आणि सामाजिक प्रश्नांबाबतची जाणीव विकसित करण्यासाठी अशा उपक्रमांचा उपयोग होतो. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील पात्र युवकांनी या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.