विद्यार्थ्यांच्या आंदोलनापुढे सरकार झुकले; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

0
13

नवी दिल्ली :
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरण, परीक्षा व्यवस्थेतील कथित त्रुटी आणि गेल्या अनेक आठवड्यांपासून देशभर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
धर्मेंद्र प्रधान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपला राजीनामा सादर करताना, “हा प्रश्न माझ्या वैयक्तिक प्रतिष्ठेचा नसून देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे. विद्यार्थ्यांच्या हिताला कोणतीही बाधा येऊ नये आणि शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास कायम राहावा, यासाठी मी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा त्याग करत आहे,” असे आपल्या पत्रात म्हटले आहे.
गेल्या महिनाभरापासून नीट परीक्षा पेपरफुटी आणि परीक्षा प्रक्रियेतील अनियमिततेच्या आरोपांवरून विद्यार्थी संघटना आणि विविध सामाजिक गटांनी देशभर तीव्र आंदोलन छेडले होते. दिल्लीतील जंतर-मंतरसह अनेक शहरांमध्ये निदर्शने झाली होती. आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, ही होती. अखेर सरकारने हा निर्णय घेतल्याने आंदोलनकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्र सरकारकडून शिक्षण खात्याची जबाबदारी कोणाकडे दिली जाणार, याकडे आता देशाचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here