ऐरोली व बेलापूर विधानसभा मतदारसंघात आज व उद्या विशेष एसआयआर कॅम्प

0
17
ऐरोली व बेलापूर विधानसभा मतदारसंघात आज व उद्या विशेष एसआयआर कॅम्प
ऐरोली व बेलापूर विधानसभा मतदारसंघात आज व उद्या विशेष एसआयआर कॅम्प

ऐरोली व बेलापूर विधानसभा मतदारसंघात आज व उद्या विशेष एसआयआर कॅम्प

नवी मुंबई :
भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमांतर्गत नवी मुंबईतील १५० ऐरोली आणि १५१ बेलापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये शनिवार (२५ जुलै) व रविवार (२६ जुलै) असे दोन दिवस विशेष एसआयआर कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत.

मा. महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार मतदार यादी पुनरीक्षणाचे काम अधिक नियोजनबद्ध व प्रभावीपणे पार पाडण्यासाठी हे विशेष कॅम्प आयोजित करण्यात आले असून, दोन्ही दिवस नागरिकांच्या सोयीसाठी संबंधित मतदार यादी भाग क्रमांकाचे बीएलओ (Booth Level Officer) कॅम्पस्थळी उपस्थित राहणार आहेत.

या कॅम्पमध्ये मतदारांना एसआयआर गणनापत्र (Enumeration Form) भरून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदारांनी आपल्या संबंधित कॅम्पला भेट देऊन बीएलओ यांच्या मार्गदर्शनाखाली गणनापत्र भरून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, १५१ बेलापूर विधानसभा मतदारसंघातील विशेष एसआयआर कॅम्पच्या ठिकाणांची यादी प्रशासनाने जाहीर केली असून, नागरिकांनी आपल्या मतदान केंद्रानुसार संबंधित कॅम्पमध्ये उपस्थित राहून प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here