विवेक भीमनवार यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

0
61

मुंबई l प्रतिनिधी

आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) च्या अध्यक्षपदी विवेक लक्ष्मण भीमनवार यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. राजभवन येथे झालेल्या या शपथविधी सोहळ्यात विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि लोकसेवा आयोगाचे पदाधिकारीही या सोहळ्यास उपस्थित होते.

या प्रसंगी लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष रजनीश शेठ, सचिव महेंद्र उत्तमराव हरपाळकर, सदस्य डॉ. अभय वाघ, सदस्य डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, सदस्य राजीव निवतकर, सदस्य डॉ. सतीश देशपांडे तसेच विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव दिलीप घुमरे आदी मान्यवर उपस्थित होते.

विवेक भीमनवार यांच्या नियुक्तीमुळे आयोगाच्या कार्यात अधिक गतिमानता येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. राज्यातील विविध शासकीय सेवांसाठी पारदर्शक व गुणवत्ताधारित निवड प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी आयोगावर असून, त्यांच्या नेतृत्वाखाली आयोगाचे कामकाज अधिक प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here