विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत राजकीय पक्षांना माहिती व मार्गदर्शन

0
4
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत राजकीय पक्षांना माहिती व मार्गदर्शन
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत राजकीय पक्षांना माहिती व मार्गदर्शन

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत राजकीय पक्षांना माहिती व मार्गदर्शन

सिंधुदुर्ग :
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील तरिणी सभागृहात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.
या बैठकीत विधानसभा मतदारसंघनिहाय प्रारूप मतदार यादीची सविस्तर माहिती राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना देण्यात आली. तसेच मतदार यादीतील नाव, पत्ता अथवा अन्य तपशिलांमध्ये त्रुटी आढळल्यास दावे व हरकती सादर करण्याची प्रक्रिया आणि त्यासाठीची मुदत याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
प्रारूप मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक करण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनीही सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले. पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत समाविष्ट करणे तसेच चुकीच्या नोंदींबाबत आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी विहित मुदतीत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत.
३० सप्टेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार असून, प्राप्त दावे व हरकतींवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे उपस्थित होते. बैठकीस उपस्थित नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना प्रारूप मतदार यादीचे वाटप करण्यात आले. प्रतिनिधींनी मतदार यादीचे बारकाईने परीक्षण करून आवश्यक असल्यास विहित मुदतीत दावे व हरकती सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले.

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदार यादीतील नोंदी अधिक अचूक करण्याचा प्रयत्न सुरू असून, या प्रक्रियेत नागरिकांसह राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी सक्रिय सहकार्य करावे, असेही यावेळी सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here