शरद पवारांची ब्रिच कँडी रुग्णालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली सदिच्छा भेट
शरद पवारांची ब्रिच कँडी रुग्णालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली सदिच्छा भेट
मुंबई :
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात जाऊन सदिच्छा भेट घेतली.
यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. तसेच त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती उपस्थित डॉक्टरांकडून घेतली. शरद पवार यांनी लवकरात लवकर पूर्णपणे बरे होऊन पुन्हा एकदा सक्रियपणे लोकसेवेत सहभागी व्हावे, अशा शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या.
या भेटीप्रसंगी विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर आणि खासदार मिलिंद देवरा उपस्थित होते.