शाळांमधील वह्या-पुस्तकांची सक्ती बंद

0
10
शाळांमधील वह्या-पुस्तकांची सक्ती बंद
शाळांमधील वह्या-पुस्तकांची सक्ती बंद

शाळांमधील वह्या-पुस्तकांची सक्ती बंद

जि.प. शिक्षण विभागाचा सर्व शाळांना आदेश

जि.प. सदस्य रुपेश पावसकर यांच्या तक्रारीनंतर मोठा निर्णय

कुडाळ :
विद्यार्थी आणि पालकांना विशिष्ट दुकानातूनच वह्या, पुस्तके आणि इतर स्टेशनरी खरेदी करण्याची सक्ती करणाऱ्या शाळांवर आता कारवाई होणार आहे. जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या शिक्षण विभागाने यासंदर्भात सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना महत्त्वाचा आदेश काढला आहे.
जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. रुपेश अशोक पावसकर, नेरुर देऊळवाडा यांनी शासकीय आणि खासगी शाळांमधून होणाऱ्या बेकायदेशीर विक्रीबाबत शिक्षण विभागाकडे लेखी तक्रार केली होती. त्यांच्या पत्राची दखल घेत शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी दिनांक 21 जुलै 2026 रोजी जा.क्र. सिजिप/शिक्षण/माध्य/आस्था-2/1382/2026 या क्रमांकाचे पत्र सर्व शाळांना पाठवले आहे.
या पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की कोणत्याही शाळेने विद्यार्थी किंवा पालकांना एकाच विशिष्ट दुकानातून साहित्य खरेदी करण्याची सक्ती करता येणार नाही. तसेच शाळेच्या आवारात वह्या, पुस्तके किंवा इतर स्टेशनरीची विक्री करण्यास पूर्णतः मनाई करण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर शिक्षण विभागाकडून कठोर कारवाई केली जाईल असेही आदेशात सांगण्यात आले आहे.
शिक्षण विभागाने सांगितले की पालकांवरील आर्थिक बोजा कमी करणे आणि विद्यार्थ्यांना कुठेही दर्जेदार साहित्य खरेदी करण्याचे स्वातंत्र्य देणे हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे.
या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नेरुर देऊळवाड्याचे जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर यांनी पालकांच्या प्रश्नासाठी पुढाकार घेतल्याने जिल्हाभरात त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here