
शिकारीला गेले अन् काळाचा घाला!
दाभोळजवळ गावठी बंदुकीचा मिसफायर; एकाचा जागीच मृत्यू, एक जखमी
दापोली | प्रतिनिधी : अरविंद मांडवकर
दापोली तालुक्यातील दाभोळ परिसरातील खोंडारण-खालचीवाडी येथे शिकारीसाठी गेलेल्या दोघांना गावठी बंदुकीतून सुटलेल्या छऱ्यांच्या गोळ्या लागल्याची धक्कादायक घटना ३० सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली. या घटनेत सचिन शांताराम शिगवण (४४) यांचा जागीच मृत्यू झाला, तर सुनील पान्दे (४८) हे गंभीर जखमी झाले आहेत.


