शिवराज्याभिषेक सोहळा २०२६साठी सूक्ष्म नियोजनाचे निर्देश
रायगडावर तयारीला वेग
रायगड (प्रतिनिधी): शिवराज्याभिषेक सोहळा २०२६ यशस्वी पार पाडण्यासाठी प्रशासनाने सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत. हा ऐतिहासिक सोहळा दि. ६ जून (तारीख) व २६ जून (तिथी) रोजी किल्ले रायगड येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
या सोहळ्यासाठी लाखो शिवप्रेमी उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन पार्किंग, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य सुविधा, स्वच्छता, वाहतूक नियंत्रण तसेच प्रकाशयोजना यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संबंधित विभागांनी आवश्यक त्या सर्व सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी समन्वयाने काम करावे, असेही निर्देश देण्यात आले.
सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीनेही विशेष उपाययोजना करण्यात येणार असून, भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.


