श्री सिद्धिविनायक मंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन
श्री सिद्धिविनायक मंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन
मुंबई :
श्री सिद्धिविनायक मंदिर परिसराच्या सुशोभीकरण प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) सदानंद शंकर सरवणकर, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार प्रसाद लाड, महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी तसेच मंदिर न्यासाचे पदाधिकारी आणि विश्वस्त उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, श्री सिद्धिविनायक मंदिरात देश-विदेशातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. भाविकांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि कमी वेळेत दर्शन घेता यावे यासाठी मंदिर परिसरात विविध पायाभूत सुविधा विकसित करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
या प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर मंदिर परिसराला आधुनिक आणि आकर्षक स्वरूप प्राप्त होईल. तसेच भाविकांसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.