संदिप भाई पारकर स्मृती रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
203
संदिप भाई पारकर स्मृती रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
संदिप भाई पारकर स्मृती रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

संदिप भाई पारकर स्मृती रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

चिंदर सेवा संघाचे आयोजन ,३४ रक्तदात्यांनी केले रक्तदान

आचरा- विवेक परब( वार्ताहर):

चिंदर येथील श्री देवी भगवती वार्षिक यात्रौत्सवाचे औचित्य साधून भगवती मंगल कार्यालय चिंदर येथे चिंदर सेवा संघ आयोजित कै. संदिप भाई पारकर स्मृती रक्तदान शिबीराला आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रारंभी चिंदर सेवा संघ उपाध्यक्ष विवेक परब, सल्लागार भाई तावडे, संतोष अपराज, वैद्यकीय डॉ भारती ठोंबरे, नर्सिंग ऑफिसर निता आरोलकर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. चिंदर सेवा संघ गेलें सहा वर्ष रक्तदान शिबीर घेत असून अनेक व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी या रक्तदान शिबिरात घेण्यात आलेल्या रक्ताचा उपयोग झाला आहे असे यावेळी बोलताना कार्यवाह सिध्देश गोलतकर म्हणाले, तर पी. एस. आय विलास टेंबुलकर, कॉन्स्टेबल अमित हळदणकर, सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, ग्रामपंचायत सदस्य दिपक सुर्वे, संदिप परब, नंदिनी पावसकर, सुनंदा अपराज, गुरु जावकर, अश्विनी पाताडे, संजय हडपी, डॉ. विवेक घाडगे, आत्माराम नाटेकर, विलास परब, गुरुनाथ नाटेकर, पोलिस पाटील दिनेश पाताडे, मंगेश नाटेकर, अरविंद घाडी, बाबरी गांवकर आदींनी रक्तदान शिबिराला शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक, सूत्रसंचालन, समारोप सिद्धेश गोलतकर यांनी केला.

हे पण वाचा मुंबई गोवा महामार्ग रखडविणाऱ्या  शासन -प्रशासन – ठेकेदार व नवीन डेडलाईनच्या निषेधार्थ तिरडी यात्रा

रक्तदान शिबिरात भूषण नारायण पाताडे, दिपक रामचंद्र तावडे, गोविंद धोंडू गांवकर, याज्ञिक दिनेश पाताडे, अनिल पांडुरंग चिंदरकर, प्रथमेश शंकर अपराज, आशिष चंद्रशेखर कोरगांवकर, तुषार विष्णू बेहेरे, पराग राजेंद्र शिरसाट, वरद संजय जोशी, विजय धाकू घाडी, ओमकार कृष्णा आचरेकर, तेजल सुरेंद्र मुळे, दत्ताराम मनोज सावंत, शंकर सदानंद पालकर, दत्तात्रय महादेव जाधव, सागर मनोहर नाटेकर, विश्वनाथ लोकेगांवकर, प्रसाद प्रताप पडवळ, सागर सत्यवान चव्हाण, निलेश विजय रेवडेकर, ललित चंद्रकांत घाडीगांवकर, दिलीप सहदेव गोसावी, श्रेयस दिपक सावंत, अमर मगर, भूषण अरविंद दत्तदास, नारायण संजय पाताडे, संतोष शामराव गोसावी, रुपेश केशव पडवळ, विजय दशरथ पवार, गिरीश पवार, शिशिर चंद्रशेखर पालकर, ओंकार तावडे, विनम्र सुहास चिंदरकर, सागर घाडी या चौतीस रक्तदात्यांनी रक्ताचे पुण्यदान केले. तर दिपक अनंत मांडवकर, दिनेश अनंत आर्वेकर, अभय आनंद पाडावे, पूनम संदिप पारकर, सानिका सुरेंद्र मुळे, रोहन शंकर गांवकर, रामचंद्र विठ्ठल परब, जगन्नाथ घाडी, ओमकार वळंजू, संपदा अपराज, संतोष पडवळ यांनी सहभाग दर्शवला.

रक्तदात्यांना भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर व संतोष गांवकर यांच्या वतीने देण्यात आलेली भेट वस्तू आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. शिबिर यशस्वी करण्यासाठी भाई तावडे, खजिनदार गणेश गोगटे, कार्यवाह सिध्देश गोलतकर, आशिष कोरगांवकर, निशांत पारकर, संतोष अपराज, रावजी तावडे, मारुती हडकर, रोहन वराडकर, शंकर पालकर, पिंट्या दळवी, प्रसाद टोपले आदींनी मेहनत घेतली. चिंदर सेवा संघाच्या वतीने रक्तदात्याचे आभार मानण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here