संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी पालकांची भूमिका महत्त्वाची – राजेंद्र प्रसाद गाड

0
17
संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी पालकांची भूमिका महत्त्वाची - राजेंद्र प्रसाद गाड
संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी पालकांची भूमिका महत्त्वाची - राजेंद्र प्रसाद गाड

संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी पालकांची भूमिका महत्त्वाची – राजेंद्र प्रसाद गाड

शाळा चिंदर नं १ येथे गुरु वंदना कार्यक्रम उत्साहात

आचरा-
विद्यार्थ्यांवर शाळेत असे पर्यंतच संस्कार आणि शिक्षण शिक्षक देत असतात परंतु विद्यार्थी नेहमी पालकांच्या सहवासात वाढत असतो त्यांच्या वर सुयोग्य संस्कार करा. भावी संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी पालकांची भूमिका महत्त्वाची आहे असे प्रतिपादन शाळा चिंदर नं १ येथे आयोजित गुरु वंदना कार्यक्रमा वेळी शाळेचे मुख्याध्यापक तसेच आचरा केंद्र प्रमुख राजेंद्र प्रसाद गाड यांनी केले. ते पुढे म्हणाले की,
लहान मुले समाजातल्या अनेक गोष्टींचे आचरण करत असतात. म्हणून पालकांनी ही विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. त्याच बरोबर विद्यार्थ्यांना आपल्या गावातील, आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीची जाण असावी. शिक्षकांनाही सध्या याबाबत प्रशिक्षण सुरू आहे. पालक आणि शिक्षक यांच्या समन्वयातून सुजाण नागरिक घडतील. गुरु वंदना कार्यक्रम म्हणजे शिक्षक आणि पालक यांच्या बद्दल आदर, कृतज्ञता आणि गुरु-शिष्य परंपरा जिवंत ठेवण्यासाठी आयोजित केलेले एक सांस्कृतिक व आध्यात्मिक आयोजन होय.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व विद्येची देवता श्री देवी सरस्वती माता यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. विद्यार्थ्यांकडून सुरूवातीला नृत्य रुपी गुरु वंदना तसेच जगदिश खेबुडकर यांनी लिहिलेल्या ‘गुरु ने दिला ज्ञान रुपी वसा’ ‘आम्ही चालवू हा पुढे वारसा’ या कवितेने करण्यात आली. अंगणवाडी पासून सातवी इयत्ते पर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यांने गुरुजनांन प्रती भावना व्यक्त केल्या. माजी सभापती हिमाली अमरे, रावजी तावडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. मनवा चिंदरकर यांनी यावेळी आपली मनोगते व्यक्त केली. व विद्यार्थ्यांच्या सभाधीट पणाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी पालक व गुरुजनांचे पाद्य पुजन करून गुरु विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी सभागृहातील वातावरण भावनिक झाले होते.
यावेळी सरपंच प्रशासक स्वरा पालकर, जान्हवी घाडी, नीलिमा घाडी, विजय घाडी, वेदिका घाडी, सानिका जाधव, प्रतीक्षा पालकर, मंजिरी केळकर, शर्वरी राणे, सतीश कदम, अनघा भोवर, भालचंद्र कावले,भावना कावले, निर्मिती घाडी, राकेश पालकर, वासुदेव परब, विनया गोसावी, समीर लब्दे, आरती पवार, संजना कोकरे, वैदेही पवार, तुषार पवार, दीक्षा तावडे, आसावरी आचरेकर, आशिष कोरगावकर, गोपाळ चिंदरकर, सुमित्रा गावकर, अर्पिता पाडावे, सतीश भांडे, ब्राम्ही दत्तदास, उत्तम घाडी, निलिमा घाडी, चिन्मयी पाताडे, राजेंद्र घाडी, सुमेधा गांवकर, वैभवी अमरे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक राजेंद्र प्रसाद गाड, उज्ज्वला पवार, रामचंद्र कुबल, नंदकुमार जुंदळे, यांना मेहनत घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र प्रसाद गाड यांनी तर बहारदार सुत्रसंचालन रामचंद्र कुबल यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here