सचिन सानप यांच्या प्रचारासाठी उदय सामंत यांची सांगोल्यात भेट
विजयासाठी शिवसैनिकांचा निर्धार
पुणे
विधानपरिषदेच्या पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील शिवसेना पुरस्कृत उमेदवार श्री. सचिन नवनाथ सानप यांच्या प्रचारार्थ मंत्री उदय सामंत यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे भेट दिली. माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांनी स्थानिक शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.



