समृद्धी महामार्गावरून एसी इलेक्ट्रिक बससेवा सुरू

0
97
समृद्धी महामार्गावरून एसी इलेक्ट्रिक बससेवा सुरू
समृद्धी महामार्गावरून एसी इलेक्ट्रिक बससेवा सुरू

समृद्धी महामार्गावरून एसी इलेक्ट्रिक बससेवा सुरू

 नाशिक–बोरिवली आणि नाशिक–छत्रपती संभाजीनगर मार्गांवर धावणार

नाशिक : अखेर समृद्धी महामार्गावरून दीर्घ प्रतीक्षेनंतर इलेक्ट्रिक एसी बससेवा सुरू झाली असून, नाशिक विभागाच्या नाशिक आगारातून या दोन महत्त्वाच्या मार्गांवर बससेवा रवाना करण्यात आली. पर्यावरणपूरक, आरामदायी आणि वेगवान अशा या आधुनिक बससेवेचा प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हे पण वाचा माजी आमदार वैभव नाईक यांनी सहकुटूंब केले मतदान
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) पर्यावरणास अनुकूल अशा ई-बससेवा वाढवण्यावर भर देत असून, त्याच अंतर्गत समृद्धी महामार्गावरून नाशिक–बोरिवली आणि नाशिक–छत्रपती संभाजीनगर या मार्गांना प्राधान्य देत सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. अत्याधुनिक एसी सुविधा, आरामदायी आसन व्यवस्था, शांत इंजिन तंत्रज्ञान आणि जलद प्रवास हा या बससेवेचा मुख्य आकर्षण आहे.

नाशिक आणि मुंबईदरम्यानचा प्रवास आता अधिक जलद व आरामदायी होणार असून, बोरिवली मार्गावरील ही बस कार्यरत होताच प्रवाशांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला आहे. तसेच नाशिक–छत्रपती संभाजीनगर या मार्गासाठीही प्रवासी मोठ्या प्रमाणावर उत्सुक असून, दोन्ही शहरांतील व्यावसायिक, विद्यार्थी आणि कुटुंबियांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

एसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, इलेक्ट्रिक बससेवा वाढवून इंधन खर्चात बचत, प्रदूषणात घट आणि प्रवाशांना अत्याधुनिक प्रवास सुविधा देण्याचे उद्दिष्ट आहे. आगामी काळात या मार्गांवर बसांची संख्या वाढवण्याचाही विचार सुरू आहे.

समृद्धी महामार्गामुळे प्रवासाचा वेळ आधीच मोठ्या प्रमाणात कमी झाला असताना, आता या इलेक्ट्रिक एसी बससेवेच्या सुरूवातीमुळे प्रवाशांचा प्रवास आणखी सुखद व जलद होणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here