सलमान खानची दिल्ली उच्च न्यायालयात धाव

0
29
सलमान खानची दिल्ली उच्च न्यायालयात धाव
सलमान खानची दिल्ली उच्च न्यायालयात धाव

सलमान खानची दिल्ली उच्च न्यायालयात धाव

‘काला हिरण : द बॅटल फॉर लेगसी’ चित्रपटावर आक्षेप

मुंबई | प्रतिनिधी
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने ‘काला हिरण : द बॅटल फॉर लेगसी’ या प्रस्तावित चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. संबंधित चित्रपट त्याच्या संमतीशिवाय तयार करण्यात येत असून त्यामध्ये त्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप खानने केला आहे.
याचिकेत सलमान खानने म्हटले आहे की, चित्रपटात त्याच्याबाबत चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती दाखवण्यात येत आहे. तसेच त्याचे कथित अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे सूचित करणारे संदर्भ वापरण्यात आल्याने त्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचू शकतो, असा दावा करण्यात आला आहे.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत दिल्ली उच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली आहे. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठासमोर होणार आहे.
दरम्यान, या याचिकेमुळे चित्रपटाच्या प्रदर्शन आणि निर्मिती प्रक्रियेवर काय परिणाम होतो, याकडे चित्रपटसृष्टीसह चाहत्यांचे लक्ष लागले आहे. न्यायालयाच्या पुढील सुनावणीत या प्रकरणाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here