सह्याद्रीच्या माथ्यावर पार पडला निसर्गसोहळा

0
29
आयोजन पदयात्रा आयोजक राजेंद्र बारभाई, देविदास कुंभार, संजय निरगुडे, रत्नाकर मोरे,अक्षय गोडसे औदुंबर शिंदे,शेखर बारभाई संदिप कुतवळ,बापू वीरकर, रवी सावित्रे, सुरेश सातभाई, सतीश कदम दिलीप बारभाई, शब्बीर तांबोळी, संजय शेवाळे, सोनाली दोडके,खोमणे बंधू, शरद फडतरे रमेश बयास, विजय झगडे, मोहन आचारी, परिश्रम घेतात तर श्री मार्तंड देवसंस्थांना मार्फत जागोजागी मोफत आरोग्य सुविधा दिल्या जातात यात डॉ प्रमोद वाघ, डॉ पोटे, डॉ नितीन केंजळे डॉ लव्हे,डॉ गुळवे सुधीर ताम्हाणे इत्यादी सहभाग दर्शवतात.

शेकडोंच्या उपस्तिथ बीज भंडाऱ्यांची उधळण. परंपरा आणि पर्यावरणनिसर्ग संवर्धनाचा दिला संदेश .

पाटण /पुरंदर .(प्रतिनिधि )

राज्यातील प्रख्यात तीर्थक्षेत्र जेजुरी (जयाद्री) येथून दरवर्षी परंपरेने निघणारी ‘जयाद्री ते सह्याद्री’ पायी पदयात्रा यंदाही भक्तिभावात पार पडली. श्री जानाईदेवी अन्नदान पदयात्रा पश्चिम सह्याद्रीच्या डोंगरकुशीत, पाटण खोऱ्यातील सडावाघापूर–काऊदरा परिसरात, समुद्र -सपाटीपासून सुमारे १३०० मीटर उंच डोंगरमाथ्यावर मंगळवारी दाखल होताच सामुदायिक निसर्गपूजेला प्रारंभ झाला.

सुमारे दीडशे किलोमीटर पायी चालत आलेल्या जेजुरीकरांसह पाटण, सातारा, कराड परिसरातील स्थानिक भक्त व निसर्गप्रेमींनी डोंगरमाथ्यावर भंडारा, गुलाल आणि विविध वृक्षांच्या बिया उधळत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. “जगातील पर्यावरण अबाधित राहो आणि विश्वाला समृद्ध वैभव लाभो,” या प्रार्थनेसह निसर्गाला श्रीफळ अर्पण करण्यात आले. शेकडो निसर्गप्रेमी या वनमहाउत्सवात सहभागी झाले होते.यावेळी पाटणचे युवा भाजपा नेते याज्ञसिहं पाटणकर,तारळे युवा कार्यकर्ते ओंकार भस्मे, सह्याद्री सखी मंच राष्ट्रवादी जेजुरी शहर अध्यक्ष रमेश लेंडे,नम्रता निरगुडे अर्चना क्षीरसागर. नगरसेवक रोहित खोमणे, समीर मोरे, उपस्तिथ होतें.

श्री जानाईदेवी मोफत अन्नदान ट्रस्टच्या माध्यमातून संपूर्ण पालखी सोहळ्यात तसेच निसर्गपूजेच्या ठिकाणी पंचक्रोशीतील डोंगरवासी बांधवांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले. डोंगरवासी महिलांना साडी-चोळी देऊन सन्मानित करण्यात आले. जेजुरी ग्रामस्थ, गुरव पुजारी, वीर, कोळी, घडशी, खान्देकरी, मानकरी, सेवेकरी, श्री मार्तंड देवसंस्थान ट्रस्ट कमिटी सदस्य तसेच संत नागू माळी यांच्या वंशजांसह समस्त माळी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. दूरदेशी नोकरी व्यवसाया निमित्त स्थायिक झालेले जेजुरीकरही या यात्रेत सहभागी झाले.

या प्रसंगी पाटण, कराड, तारळे येथील निसर्गप्रेमी, वनविभाग अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, वन्यजीव अभ्यासक आणि पक्षीमित्र यांनीही सहभाग नोंदविला. संपूर्ण परिसर भक्तीमय आणि निसर्गमय वातावरणाने भारून गेला. पारंपरिक पद्धतीने धार्मिक आरती व ‘वसुंधरा आरती’ने कार्यक्रमाची सांगता झाली आणि पालखी सोहळा निवकणे मुक्कामी मूळ स्थानी विसावला.

अलीकडच्या काळात पर्यावरण संरक्षण आणि निसर्गसंवर्धनाच्या जाणीवा दृढ करण्यासाठी अशा सामुदायिक निसर्गपूजेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आध्यात्मिक श्रद्धा आणि पर्यावरणाबद्दलची जबाबदारी यांचे प्रतीक असलेला हा सोहळा समाजातील एकात्मता आणि निसर्गाशी असलेले आपले नाते अधिक दृढ करत असल्याचे चित्र यानिमित्त पाहायला मिळाले.पायी पदयात्रेत भविकांना मोफत सुविधा जयाद्री ते सह्याद्री या पायी पदयात्रेत हजारो भविकांना गेली बत्तीस वर्ष मोफत अन्नदान सेवा जानाईदेवी अन्नदान ट्रस्ट मार्फत केली जाते यात जेजुरी नगरींतील अनेक उद्योजक व्यापारी गुरव पुजारी मानकरी खान्देकरी ग्रामस्थ हातभार लावत असतात याचे 

आयोजन पदयात्रा आयोजक राजेंद्र बारभाई, देविदास कुंभार, संजय निरगुडे, रत्नाकर मोरे,अक्षय गोडसे औदुंबर शिंदे,शेखर बारभाई संदिप कुतवळ,बापू वीरकर, रवी सावित्रे, सुरेश सातभाई, सतीश कदम दिलीप बारभाई, शब्बीर तांबोळी, संजय शेवाळे, सोनाली दोडके,खोमणे बंधू, शरद फडतरे रमेश बयास, विजय झगडे, मोहन आचारी, परिश्रम घेतात तर श्री मार्तंड देवसंस्थांना मार्फत जागोजागी मोफत आरोग्य सुविधा दिल्या जातात यात डॉ प्रमोद वाघ, डॉ पोटे, डॉ नितीन केंजळे डॉ लव्हे,डॉ गुळवे सुधीर ताम्हाणे इत्यादी सहभाग दर्शवतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here