राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगाव संत गजानन महाराज समाधी दर्शन

0
63
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगाव संत गजानन महाराज समाधी दर्शन
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगाव संत गजानन महाराज समाधी दर्शन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगाव संत गजानन महाराज समाधी दर्शन

शेगाव l प्रतिनिधी

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थान येथे भेट देत संत श्री गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. राष्ट्रपतींच्या आगमनानिमित्त मंदिर परिसरात विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

दर्शनानंतर राष्ट्रपतींनी मंदिर परिसराची पाहणी करत संस्थानच्या कार्याची माहिती घेतली. मंदिरातील विविध उपक्रम, भक्तनिवास व्यवस्था तसेच सामाजिक आणि आध्यात्मिक कार्याचा आढावा त्यांनी घेतला. दर्शनानंतर राष्ट्रपतींनी मंदिर परिसराची पाहणी करत संस्थानच्या कार्याची माहिती घेतली. मंदिरातील विविध उपक्रम, भक्तनिवास व्यवस्था तसेच सामाजिक आणि आध्यात्मिक कार्याचा आढावा त्यांनी घेतला.

यावेळी आचार्य देवव्रत, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण, आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, संस्थानचे विश्वस्त निळकंठ शिवशंकर पाटील, हरिहर निळकंठ पाटील तसेच आयुष मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रपतींच्या या भेटीमुळे शेगाव परिसरात भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here