सागरी सुरक्षा चषक कबड्डी २०२६- पोयनाड पोलीस ठाण्याची पुरुष व महिला गटांत बाजी

0
9
सागरी सुरक्षा चषक कबड्डी २०२६- पोयनाड पोलीस ठाण्याची पुरुष व महिला गटांत बाजी
सागरी सुरक्षा चषक कबड्डी २०२६- पोयनाड पोलीस ठाण्याची पुरुष व महिला गटांत बाजी

सागरी सुरक्षा चषक कबड्डी २०२६- पोयनाड पोलीस ठाण्याची पुरुष व महिला गटांत बाजी

पुरुष व महिला दोन्ही गटांत प्रथम क्रमांक

सागरी सुरक्षा चषक २०२६ च्या दुसऱ्या पर्वाची सांगता; वडखळ, श्रीवर्धन, मांडवा आणि दिघी सागरी पोलीस ठाण्यांच्या संघांनीही पटकावली पारितोषिके

रायगड :
सागरी सुरक्षेचा संदेश अधिक दृढ करण्यासाठी रायगड पोलीस दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘सागरी सुरक्षा चषक कबड्डी स्पर्धा २०२६’च्या दुसऱ्या पर्वातील पुरुष आणि महिला विभागांचे अंतिम निकाल जाहीर झाले आहेत. दोन्ही विभागांत पोयनाड पोलीस ठाण्याच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावत दुहेरी बाजी मारली.

पुरुष विभागात पोयनाड पोलीस ठाण्याच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला. वडखळ पोलीस ठाण्याचा संघ द्वितीय, तर श्रीवर्धन पोलीस ठाण्याचा संघ तृतीय क्रमांकावर राहिला.

महिला विभागातही पोयनाड पोलीस ठाण्याच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले. मांडवा पोलीस ठाण्याच्या संघाने द्वितीय, तर दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला.

खेळातून समन्वय, एकजुटीतून सागरी सुरक्षेचा संकल्प, या उद्देशाने आयोजित स्पर्धेत खेळाडूंनी उत्साहाने सहभाग घेतला. कबड्डीच्या माध्यमातून संघभावना, परस्पर समन्वय आणि शिस्त यांना प्रोत्साहन देतानाच सागरी सुरक्षेप्रती असलेली बांधिलकी अधिक बळकट करण्याचा संदेश देण्यात आला.
स्पर्धेतील सर्व विजेत्या संघांचे रायगड पोलीस दलाकडून अभिनंदन करण्यात आले. सागरी सुरक्षेसाठी रायगड पोलीस दल सदैव सज्ज आणि कटिबद्ध असल्याचा संदेशही या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here