सातारा येथे २३ मे रोजी माजी सैनिक मेळावा; निवृत्ती वेतन, SPARSH व आरोग्य सुविधांबाबत मार्गदर्शन
सातारा येथे २३ मे रोजी माजी सैनिक मेळावा; निवृत्ती वेतन, SPARSH व आरोग्य सुविधांबाबत मार्गदर्शन
Ex-Servicemen Rally Satara 2026 अंतर्गत माजी सैनिक, वीरनारी आणि वीर कुटुंबीयांसाठी २३ मे २०२६ रोजी सातारा येथे विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
Station Headquarters Kolhapur तसेच 109 MARATHA INF BN (TA) यांच्या वतीने हा मेळावा आयोजित करण्यात आला असून, श्रीमंत छत्रपती अभयसिंग राजे भोसले बहुउद्देशीय सभागृह, Satara येथे सकाळी ८ वाजता कार्यक्रमास सुरुवात होणार आहे.
या मेळाव्यात माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, वीरनारी, वीरमाता आणि वीरपिता यांच्या विविध समस्यांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
मेळाव्यातील प्रमुख सुविधा :
निवृत्ती वेतन विषयक मार्गदर्शन
SPARSH Portal संदर्भातील अडचणींचे निरसन
रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन
वीरनारी, वीरमाता व वीरपिता यांना मिळणाऱ्या शासकीय सुविधांची माहिती
विविध बँकांचे स्टॉल
मोफत मेडिकल कॅम्प
मेडिकल कॅम्पमध्ये उपलब्ध तपासण्या :
नेत्ररोग (Eye Specialist)
कान-नाक-घसा (ENT)
शस्त्रक्रिया विभाग (Surgery)
अस्थिरोग (Ortho)
जनरल मेडिसिन
ECHS सुविधा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इच्छुक माजी सैनिक, वीरनारी, वीरमाता, वीरपिता आणि माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांनी या मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून करण्यात आले आहे.