“बहुत हुई महंगाई की मार, अब भगाओ मोदी सरकार!” अशा घोषणांनी मुंबईतील मंत्रालय परिसर दणाणून गेला.राष्ट्रवादी युवक काँग्रेस- शरदचंद्र पवार *Nationalist Youth Congress – Sharadchandra Pawar faction) च्या वतीने पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढ, NEET पेपरफुटी प्रकरण तसेच वाढत्या बेरोजगारीच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन प्रदेशाध्यक्ष श्री. मेहबूब शेख (Mehboob Sheikh) यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. आंदोलनादरम्यान केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरू असलेला खेळ थांबवून NEET पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, इंधन व गॅस दरवाढ तातडीने कमी करावी तसेच बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशा मागण्या केल्या.
या आंदोलनात श्री. सुनील गव्हाणे (Sunil Gavhane,) प्रदेश उपाध्यक्ष सचिन नारकर (Sachin Narkar) प्रदेश सरचिटणीस नताशा आव्हाड (Natasha Awhad), रामेश्वर पवार (Rameshwar Pawar), शहाबाज पटेल (Shahbaz Patel), हारुण खान (Haroon Khan), समाधान म्हात्रे (Samadhan Mhatre),योगेश पदरे (Yogesh Padare), कुंदन काळे (Kundan Kale0 आणि किरण शिखरे (Kiran Shikhare0 यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आंदोलनामुळे मंत्रालय परिसरात काही काळ राजकीय वातावरण तापले होते.