अलिबाग नगरपरिषदेचे बहुप्रतिक्षित क्रीडा संकुल आता अलिबागकर नागरिकांसाठी खुले.
अलिबाग नगरपरिषदेचे बहुप्रतिक्षित क्रीडा संकुल आता अलिबागकर नागरिकांसाठी खुले
अलिबाग :
अलिबाग नगरपरिषदेचे बहुप्रतिक्षित क्रीडा संकुल आता अलिबागकर नागरिकांसाठी खुले झाले आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे.
अलिबाग शहरातील सर्व नागरिकांना आता स्वतःचे एक उत्तम क्रीडा व्यासपीठ उपलब्ध झाले असून या संकुलामध्ये स्विमिंग पूल, बॅडमिंटन कोर्ट, कॅरम, टेबल टेनिस, जिम तसेच योगा रूम अशा विविध सुविधा उपलब्ध आहेत.
या उद्घाटन प्रसंगी आपल्या दमदार आमदार महेंद्र दळवी यांच्यासोबत टेबल टेनिस खेळण्याची संधी मिळाली, हा एक विशेष अनुभव होता.
नगराध्यक्षा अक्षया नाईक आणि जिल्हा परिषद सदस्या अदिती नाईक-दळवी या आपल्या आईंचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करत होत्या. यावेळी सर्वांनी स्व. नमिता नाईक यांची भावपूर्ण आठवण काढली.
अलिबागच्या क्रीडा आणि आरोग्यदायी भविष्यासाठी हे संकुल निश्चितच एक मोठे पाऊल ठरणार आहे.