११ वी ऑनलाईन प्रवेशाचे पोर्टल डाऊन, फक्त दोन दिवस अर्ज भरायला !

0
32
११ वी ऑनलाईन प्रवेशाचे पोर्टल डाऊन, फक्त दोन दिवस अर्ज भरायला !
११ वी ऑनलाईन प्रवेशाचे पोर्टल डाऊन, फक्त दोन दिवस अर्ज भरायला !

११ वी ऑनलाईन प्रवेशाचे पोर्टल डाऊन, फक्त दोन दिवस अर्ज भरायला !

११ वी ऑनलाईन प्रवेशाचे पोर्टल डाऊन झाल्यामुळे पहिल्या फेरीचे वेळापत्रक कोलमडले आहे. राज्यभरात अनेक विद्यार्थी सकाळपासून तासनतास पसंतीक्रम भरण्यासाठी ताटकळत आहेत. त्यासह नवीन नोंदणी, अर्जाचा भाग-२ ही प्रक्रियाही ठप्प पडली आहे.
विद्यार्थ्यांना या प्रक्रियेसाठी २१ व २२ मे असा केवळ दोनच दिवसाचा कालावधी देण्यात आला आहे. प्रक्रिया दोन दिवसात पूर्ण होते का, पसंतीक्रम देता येईल का, अशा प्रश्नांनी पालक, विद्यार्थी गोंधळून गेले आहेत.
दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील लाखो विद्यार्थी अर्ज करणार हे ठाऊक असूनही सर्व्हरची क्षमता का वाढवली जात नाही? तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या शिक्षण विभागाचा कारभार अजूनही संथ गतीने सुरू आहे. विद्यार्थ्यांचा वेळ आणि मानसिक शांतता याला प्रशासनाच्या लेखी काही किंमत उरलेली नाही.
दरवर्षी येणाऱ्या या तांत्रिक अडचणींवर शिक्षण विभागाने आता कायमस्वरूपी तोडगा काढावा आणि यावर्षी २१ आणि २२ मे ही दिलेली मुदत वाढवून द्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here