सावंतवाडी चोरी, घरफोडीतील संशयितास न्यायालयीन कोठडी
सावंतवाडी
सावंतवाडीत घडलेल्या चोरी व घरफोडीप्रकरणी पोलीस कोठडीत असलेला सांगली येथील हड्या गुड्या टोळीतील देवगन विजय उर्फ बापू पवार (२४) याला सोमवारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.या टोळीतील देवगन पवार व त्याचा साथीदार असे दोघे फरार झाले होते. पोलिसांनी शोध घेत देवगन पवार याला शुक्रवारी अटक केली होती. चोरी व घरफोडीप्रकरणी न्यायालयाने त्याला सोमवार, २४ नोव्हेंबरपर्यंत चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. या गुन्ह्यात फरार असलेल्या एका साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.आतापर्यंत पोलिसांनी या गुन्ह्यात या टोळीतील पाचजणांना अटक करून पोलीस कोठडीनंतर त्यांची रवानगी न्यायालयात केली आहे. ९ जुलै रोजी सावंतवाडी शहरातील शिल्प ग्राम व श्रमविहार कॉलनी परिसरात चोरी व घरफोड्या केल्या होत्या.


